मुंबई : सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे (Fuel Rate) सर्वसामन्य जनता आधीच मेटाकुटीला आली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. एसटी महामंडळाने (Msrct) ऐन दिवाळीत भाडेवाढीचा (ST Bus Fare Hike) निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत (Diwali 2022) एसटीने प्रवास करण्यासाठी आता खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. (10 percent seasonal increase in msrtc st fare from 21st to 31st October)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीने 10 टक्क्यांनी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिकीट दरवाढ 21 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत भाऊबीज, लक्ष्मीपूजनानिमित्ताने अनेक जण गावी प्रवास करतात. एसटी थेट गावात सोडते, त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने अतिरिक्त पैसे मोजून एसटीनेच प्रवास करावा लागणार आहे.  


दरम्यान ही एसटीची भाडेवाढ हंगामी स्वरुपाची आहे. एकूण 10 दिवसच ही भाडेवाढ असणार आहे. 21 ते 31 ऑक्टोबरदरम्यानच अतिरिक्त भाडेवाढ आकारण्यात येणार आहे. मात्र या भाडेवाढीला शिवनेरी आणि अश्वमेध या बसेस अपवाद असणार आहेत. 


सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास शिवनेरी आणि अश्वमेध या एसटी बसेस वगळता इतर सर्व बसमधून प्रवास करणाऱ्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलंय, त्यांच्याकडून वाढीव रक्कम आकारली जाणार आहे.