मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील फरार दहशतवादी अहमद लंबूला अटक करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. अहमद लंबूला अटक करण्यात आल्याने या खटल्याची अधिक उकल होण्यास मदत होणार आहे. दरम्यान त्याआधी परदेशात आश्रय घेतलेल्या आरोपींना भारतात आणण्यात पोलिसांना यश आलेय. यात सात आरोपींमध्ये पोर्तुगाल देशातून प्रत्यार्पण करून आणलेला माफिया डॉन अबू सलेम, दुबईहून अटक केलेला मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाझ सिद्धक्की, करीमुल्ला शेख आणि अब्दूल क्युम शेख यांचा समावेश आहे.


बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण १२९ आरोपी होते. त्यापैकी १०० आरोपींना टाडा न्यायालयानं दोषी ठरवून ६ महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुख्य सूत्रधार याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात आलीय. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिमसह एकूण २७ आरोपी अजून फरार आहेत.


१९९३ मध्ये मुंबई १३ साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. मुंबईतल्या या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण १२९ आरोपी होते. त्यापैकी १०० आरोपींना टाडा न्यायालयानं दोषी ठरवून ६ महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुख्य सुत्रधार याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात आलीय. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिमसह एकूण २७ आरोपी अजून फरार आहेत. मात्र, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्यसूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असून तो अद्याप फरार आहे.


१९९३ चा बॉम्बस्फोट घटनाक्रम


मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) बिल्डिंगमध्ये १२ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान पहिला स्फोट झाला. इमारतीच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये आरडीएक्स भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. या ८४ लोकांचा मृत्यू झाला होता. २०० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते. पुढील दहा मिनिटांत नर्सी नत्था स्ट्रीटवरील धान्य बाजारात उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये स्फोट झाला. पुढील ५० मिनिटांत स्टॉक एक्सचेंजपासून जवळच असलेल्या एअर इंडियाच्या इमारतीलच्या पार्किंगमध्ये जबरदस्त स्फोट झाला.


दुपारी १.३० वाजता - मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये स्फोट


दुपारी २.१५ वाजता - नरसी नाथ रोडवर स्फोट


दुपारी २.३० वाजता - शिवसेना भवनाजवळ तिसरा स्फोट


दुपारी २.३३ वाजता - एअर इंडियाच्या इमारतीजवळ स्फोट


दुपारी २.४५ वाजता - सेन्चुरी बाजारात स्फोट


दुपारी २.४५ वाजता - माहीममध्ये स्फोट


दुपारी ३.०५ वाजता - झवेरी बाजारात स्फोट


दुपारी ३.१० वाजता - सी रॉक हॉटेलमध्ये स्फोट


दुपारी ३.१३ वाजता - प्लाझा सिनेमाजवळ स्फोट


दुपारी ३.२० वाजता - जुहू सेंटर हॉटेलमध्ये दहावा स्फोट


दुपारी ३.३० वाजता - सहार एअरपोर्टजवळ स्फोट


दुपारी ३.४० वाजता - एअरपोर्ट सेंटर हॉटेलमध्ये बारावा स्फोट