मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक वातानुकूलित मिनी बसेस
मुंबईकरांच्या सेवेसाठी आता मुंबईत बेस्टमार्फत मोठ्या प्रमाणात मिनी बसेस चालवण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईकरांच्या सेवेसाठी आता मुंबईत बेस्टमार्फत मोठ्या प्रमाणात मिनी बसेस चालवण्यात येणार आहेत. भाडेतत्त्वावर या मिनी बसेस चालवण्यात येणार आहेत. वातानुकूलित असणाऱ्या या बेस्ट बसेस मध्ये सीसीटीव्ही ही लावण्यात आले आहेत.
मुंबईच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी या मिनी बसेस उपयोगी ठरणार आहेत. वडाळा आगार इथे २५ मिनी बसेस दाखल झाल्या आहेत. येत्या सहा महिन्यात या मिनी बसेसची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. सध्या एकूण ११६ मिनी बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. वडाळा आगारात या मिनी बस दाखल झाल्या आहेत.