म्हाडाच्या ९०१८ घरांसाठी आज विक्रमी ऑनलाईन सोडत
सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन सोडत काढली जाईल.
मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९०१८ घरांची विक्रमी ऑनलाईन सोडत आज काढण्यात येणार आहे. ऑनलाईन सोडतीसाठी ५५,३२४ अर्ज आलेत. वांद्र्याच्या गृहनिर्माण भवन या मुख्यालयात सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन सोडत काढली जाईल.
थेट वेब कास्टींग
या सोडतीचे थेट वेब कास्टींग करण्यात येणार आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येईल.