धक्कादायक! अखेर तनुश्रीने नाना पाटेकरांच्याविरोधात हे पाऊल उचललं
धक्कादायक! अखेर तनुश्रीने नाना पाटेकरांच्याविरोधात हे पाऊल उचललं
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने शनिवारी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यामुळे नाना पाटेकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, २००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या प्रसंगाविषयी पोलिसांना तक्रार दाखल करून घेतली आहे. या तक्रारीत तनुश्रीने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांचा उल्लेख केला आहे.
तत्पूर्वी राजस्थानमध्ये चित्रीकरणासाठी गेलेले नाना पाटेकर हेदेखील मुंबईत परतले आहेत. तनुश्री खोटे बोलत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तरपणे भूमिका मांडणार आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणावरून बॉलिवूडमधील अनेक कलाकार तनुश्रीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीत दोन गट पडले आहेत.