`हा मूर्ख माणूस जीव धोक्यात घालतोय`, स्कूटरवरुन 7 मुलांना नेणाऱ्याची तक्रार, मुंबई पोलीस म्हणाले `हा तर...`
Viral Video: मुंबईतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती स्कूटरवरुन 1,2 नव्हे तर चक्क 7 मुलांना बसवून धोकादायकपणे प्रवास करत होता. मुंबई पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली असून बेड्या ठोकल्या आहेत.
Viral Video: वाहन चालवताना नियमांचं पालन करणं हे फक्त आपल्याच नाही इतर वाहनांमधील प्रवासी आणि रस्यावर चालणाऱ्यांच्याही सुरक्षेसाठी महत्त्वाचं असतं. नियमांचं पालन न करत आपण इतरांचाही जीव धोक्यात टाकत असतो. यामुळेच अशा बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई होणं गरजेचं असतं. दरम्यान, अशाच पद्धतीने आपल्यासह लहान मुलांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कपाळावर हात मारुन घ्या. कारण हा व्यक्ती एका स्कूटरवरुन तब्बल 7 मुलांना घेऊन प्रवास करत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याच्यावर कारवाई केली आहे.
मुंबईतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती स्कूटरवरुन एकूण 7 मुलांना बसवून नेत होता. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एकाने व्हिडीओ शूट करत ट्वीट केला आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही या व्हिडीओची दखल घेत या चालकावर कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात कलम 308 (एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरु शकतं असं कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या चालकाचं नाव मुनव्वर शाह असं आहे. त्याचं नारळाचं दुकान आहे. व्हायरल व्हिडीओत मुनव्वर शाह स्कूटरवरुन तब्बल 7 मुलांना नेत असल्याचं दिसत आहे. यामधील तीन मुलं त्याच्या शेजारी राहणारी आहेत. मुनव्वर या सर्वांना शिकवणीला सोडण्यासाठी जात होता. पोलीस तपासात हा व्हिडीओ ताडदेवमधील असल्याचं समोर आलं. तसंच 21 ते 24 जूनदरम्यान शूट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
व्हिडीओत मुनव्वर शाह किती धोकादायकपणे मुलांना Activa वरुन नेत आहे हे दिसत आहे. यामधील एक मुलगा तर चक्क मागे असणाऱ्या स्टँडवर अत्यंत धोकादायकपणे उभा होता. जर दुर्दैवाने गाडीचा अपघात झाला असता तर काय झाला असता याचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही.
बाईकवर दोन मुलींचा स्टंट
याआधी मुंबई पोलिसांनी बाईकवर दोन मुलींना बसवून स्टंट करणाऱ्या एका तरुणाला अटक केली होती. सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ता मुश्ताक अंसारी यांनी व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी Pothole Warriors नावाच्या ट्विटरवरुन व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी फैय्याज कादरी नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती दिली होती. बीकेसी पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.