मुंबई :  मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली. कोर्टाने ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  तर याशिवाय पाचव्या दोषी रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने सालेम आणि करिमुल्ला यांना दोन-दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. यात एक बातमी समोर येत की कोर्टात अबू सालेम आणि ताहीर मर्चेंट यांच्यात भांडण झाले. 


झालं असं की... 


१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने ताहीर मर्चेंट याला फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकल्यावर त्याला धक्काच बसला आणि तो कोर्टात खाली बसला. यानंतर कोर्टाने कक्षात अबू सालेमने सांत्वना देण्यासाठी मर्चेंटच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावेळी मर्चेंट भडला आणि त्याने अबू सालेमचा हात झटकला. त्यानंतर या दोघांमध्ये भांडणही झाले. 


अबू सालेमला शिक्षा सुनावली तेव्हा... 


अबू सालेमला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा काही काळ त्याला समजलेच नाही. नंतर तो अस्वस्थ झाला. त्यानंतर अबू सालेमने आपल्या वकीलाच्या माध्यमातून स्वतःला महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याही जेलमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले.  यापूर्वीही त्याच्यावर तीनवेळा प्राणघातक हल्ला झाला होता. असे कारण त्याने पुढे केले.