Waqf Board Scam वरुन राज्य सरकारला इम्तियाज जलील यांचं आव्हान
वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची (Waqf Board Scam) सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्यात यावी, अशी मागणी ही औरंगाबाद लोकसभा मतजदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची (Waqf Board Scam) सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्यात यावी, अशी मागणी ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. तसेच हिमंत असेल तर राज्य सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी लावावी, असं थेट आव्हानचं जलील यांनी दिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं आहे. तसंच त्तकालीन अल्पसंख्यांक मंत्री नसीम खान यांच्यावरही जलील यांनी निशाणा साधला. मुंबईत एमआयएमचे प्रमुख असुद्दीन औवेसी यांच्या सभेसाठी जलील दाखल झाले होते. यावेळेस ते झी 24 ताससह बोलत होते. (aimim aurangabad mp Imtiyaz Jaleel Syed give challenge to maharashtra ncp and inc leader over to cbi inquiry of waqf board scam)
जलील काय म्हणाले?
"काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणा असेल तर, वक्फ बोर्ड घोटाळ्याचं सीबीआय चौकशी करण्याचं पत्र द्यावं", असं आव्हान जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं.
"तुमच्या हिंमत असेल आणि स्वच्छ प्रतिमेचे असाल, तुम्ही घोळ केला नसेल, तर तुम्ही सीबीआयचं पत्र द्या. मोठ्या घोटाळ्यांची सीबीआयने चौकशी करावी, असा आशयाचं पत्र मी ही देतो", असंही जलील यांनी नमूद केलं.
"त्तकालीन अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी घोळ केला होता. त्यांनी वडिलांची जहागीर असल्यासारखं वक्फ बोर्डाची जागावाटप केली", असा आरोपही जलील यांनी केला. दरम्यान यावरुन आता नसीम खान काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
वक्फ बोर्ड म्हणजे नक्की काय?
मुस्लिमांच्या भल्यासाठी काही ठराविक जागा देण्यात येते. त्या संपत्तीला वक्फ म्हंटलं जातं. या जागावाटपेतून होणाऱ्या उत्तपन्नाची माहिती ठेवण्याची जबाबदारी ही वक्फ बोर्डाची असते. राज्यात वक्फ बोर्डाच्या नावे एकूण 23 हजार 566 मालमत्ता आहेत. वक्फ बोर्डाकडे एकूण 37 हजार 330 हेक्टर इतकी जागा आहे.
वक्फ बोर्डाचा 1 हजाराहून अधिक मालमत्तांवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्यात आलेला आहे. वक्फशी संबधीत असलेल्या संघटनाही या जागा भाडेतत्वावर देऊ शकतात. या भाड्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.