Maharashtra Assembly : बंडखोरी करून भाजपच्या (BJP) साथीने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची (Shinde Government) आज पहिली कसोटी आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकार आज अध्यक्षपदाची निवड आणि विश्वासदर्शक ठराव या माध्यमातून शिंदे सरकार शक्तीप्रदर्शन करेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्या चुरस आहे. 


दरम्यान, या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला हजर राहणार की गैरहजर राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 


अजित पवार यांना कोरोनाची (Ajit Pawar)लागण झाली होती. या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वतःला होम आयसोलेट करुन घेतलं होती. प्रकृतीच्या कारणास्तव ते येण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात होतं. 


यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे आणि थोड्याचवेळात ते विधीमंडळात येणार आहेत. 


27 जूनला अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.  त्यानंतर काल रात्री टेस्ट पुन्हा केली होती. ती निगेटिव्ह आली आहे.