अजित पवार थोड्याच वेळात मौन सोडणार; छगन भुजबळही उपस्थित
२० तासांपासून अज्ञातवासात राहिल्यानंतर अजित पवार थोड्याच वेळात मौन सोडणार
मुंबई : २० तासांपासून अज्ञातवासात राहिल्यानंतर अजित पवार काही वेळातच पत्रकारपरिषद घेणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रपरिषदेसाठी छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत.
पत्रपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असून कार्यकर्त्येही मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. या परिषदेतून अजित पवार काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीत त्यांच्यात काय बोलणे झाले याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या भेटीवेळी सुप्रिया सुळेही चर्चेसाठी उपस्थित होत्या. मात्र या भेटीदरम्यान रोहीत पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांचा समावेश नव्हता. या दोघांच्या भेटीनंतर आता पत्रकार परिषदेत अजित पवार काय बोलणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.