मुंबई :  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बंधु अजिताभ बच्चन यांनी दोन दिवसांआधी कार चोरीला गेल्याची तक्रार दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी जुहू तारा रोडवर एका हॉटेलच्या बाहेर कार पार्क केली होती. सांताक्रूझ पोलीस स्थानकात याची तक्रार आली आणि तपास सुरू झाला. 


पोलिसांनी जेव्हा तपास करायला सुरूवात केली तेव्हा वेगळेच सत्य समोर आले.


अजिताभ यांनी त्यांची गाडी बेकायदेशीररित्या पार्क केल्याने ट्रॅफिक पोलिस घेऊन गेले. 


पोलिसात तक्रार 


पोलिस सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ ते ३ दरम्यान गाठी उचलली. त्यावेळी ते काही कामासाठी हॉटेल अजंतामध्ये गेले होते. ३ वाजता रिटर्न आल्यावर त्यांना आपली गाडी दिसली नाही.


त्यांनी ३.१५ वाजता सांताक्रूझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. 


सीसीटीव्हीत सापडली 


अजिताभ यांच्या सांगण्यानूसार पोलिसांची टीमने काही ठिकाणी शोध सुरू केला. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहता ती कार ट्रॅफिक पोलिसांनी नेल्याचे समोर आले. 


दंड आणि खर्च 


मोटार वाहन अधिनियमानुसार नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्यामू त्यांना २०० रुपये दंड द्यावा लागला. तसेच कार नेण्याचा खर्चही द्यावा लागला. 


अजिताभ यांनी यासंदर्भात काहीही वक्तव्य करण्यास मनाई केली.