Alia Bhatt Sleeping Video: भर कार्यक्रमात झोप लागण्याची सवय तुम्हालाही असेलच. खूप लांबलचक भाषण सुरू असेल तर आपल्यालाही झोप लागतेच. खरंतर ही सर्व प्रक्रिया आपल्या मेंदूची असते. जर का आपलं मनं, कान, डोळे समोरच्या व्यक्तीकडे, त्याच्या बोलण्याकडे एकाग्र होत नसतील तर आपल्याला साहजिकच झोप लागते. त्यात काही गैर नाही खरंतर... पण तुम्ही एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला गेला असाल आणि त्यातून तुम्ही जर का फारच महत्त्वाच्या व्यक्ती असाल आणि त्यात व्हीव्हीआयपी आहात म्हणून तुम्हाला आदरानं एका कार्यक्रमाला बोलावलं असेल आणि तुम्ही त्या कार्यक्रमात पेंगू लागलात तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती असाल आणि तरीही तुम्ही भर कार्यक्रमात झोपलात तर तुम्हालाही अनेक लोकं चक्क शिव्या घालतात. सध्या असंच काहीसं लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टचं झालं आहे. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात कार्यक्रम सुरू असतानाच ती झोपताना दिसते आहे, असे वाटते. त्यातून तिचे डोळेही मिटलेले आहेत. 


काल इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व मुंबई आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. यंदा आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनीही हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या टॉपच्या सेलिब्रेटींनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी शाहरूख खान, दिपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही हजेरी लावली होती. त्यांना विशेष पाहुणे म्हणून उपस्थित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. सोबतच त्यांनी 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्यात येण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. कालपासून याची चर्चा सुरू झाली आहे. 



हेही वाचा : अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?


यावेळी आलियाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आलियाला सपाटून ट्रोल करण्यात आलं आहे. भर कार्यक्रमात अशाप्रकारे झोपल्यानं तिची सर्वत्र खिल्ली उडवली जाते आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा आहे. या फोटोखाली एकानं लिहिलंय की, 'जेव्हा नवऱ्याची एक्स ही समोर बसलेली असेल तेव्हा असंच होतं.' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, 'अगं, आलिया तू तर बोरंच झालीच.' तर अशाच एका युझरनं लिहिलंय, 'आलिया तर झोपलीच की'