प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : सर्वांनाच आता वेध लागले आहेत ते नववर्ष स्वागताचे. यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांची निवड केली आहे. रायगडमधले सर्वच किनारे आता हाऊसफुल झालेत. नाताळची सुट्टी, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचं सेलिब्रेशन, यामुळे मुंबई-पुण्यापासून जवळचं डेस्टिनेशन असलेले रायगडचे किनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेले आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर निवांत अशा अलिबाग, मुरूड, नागाव, काशिद, दिवेआगरच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची जणू जत्राच फुलली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळे वॉटरस्पोर्टस, उंटसवारी, घोडागाडी यामुळे पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यासोबतच ताज्या मासळीवर यथेच्छ ताव मारून जीभेचे चोचले पुरवले जाताहेत. पर्यटकांना खुश करण्यासाठी इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी आकर्षक सवलती देऊ केल्या आहेत. 


नववर्ष स्वागताचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. ते कसं साजरं करायचं याचे प्रत्येकाचे बेत आधीच ठरलेले आहेत. अशात रायगडचे स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि इथलं निसर्गसौंदर्य नववर्ष स्वागताकरता उत्तम पर्याय आहे.