‘अंबानींना भेटायचंय, मी युरोपचा अंबानी!’ अँटिलियाच्या गार्डने एका वाक्यात जागा दाखवली! Viral Video
मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे घर कायमच आकर्षणाच विषय असतो. हे आकर्षण परदेशी पाहुण्यांना देखील आहे. असेच दोन तरुण मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचले. तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्यांना एक वाक्यात आपली जागा दाखवली.
Rich Kid Ambani House Video : अंबानी यांना भेटणे हे सहज सोपे नाही? आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना आहेच. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन परदेशी मुलं मुकेश अंबानी यांना भेटण्यासाठी हट्ट करु लागले. हाफ पँट आणि टीशर्ट घालून आलेल्या या मुलांनी सिक्युरिटीसोबत हुज्जत घालायला लागले.
मुलं अंबानींना विचारु लागले की, हे अंबानींच घर आहे? अंबानी घरी आतमध्ये आहेत का? या दोन परदेशी मुलांचं सगळं संभाषण शूट केलं जातं होतं. ही परदेशी तरुण सिक्युरिटी गार्डशी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत होते.
पण यावर सिक्युरिटी गार्डने परदेशी तरुणांना एका शब्दाच आपली जागा दाखवली. तरुणांच्या हाव भावावरुन देखील अंदाज येत आहे की, या मुलांना पूर्व कल्पना होती की, अंबानी आपल्याला सहज भेटणार नाहीत. तरी देखील हे तरुण सिक्युरिटी गार्डसोबत आपला व्हिडीओ बनवताना दिसले.
यामधील एक तरुण टीशर्ट आणि शॉर्ट पँटमध्ये दिसत आहे. तर दुसरा मुलगा टीशर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे. या पदरेशी तरुणांचं संभाषण ऐकून अंबानी यांचा सिक्युरिटी गार्ड पुढे आला. तेव्हा त्या तरुणांनी सांगितलं की, मी अंबानींचा मित्र आहे. तेव्हा गार्डने विचारलं की, त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे का? तेव्हा परदेशी तरुणाने उत्तर दिलं की, मी अमिर मुलगा आहे. मी त्यांना लग्नात भेटलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी त्यांना कधीही भेटायला येऊ शकतो.
गार्डला समजले की, मुले फक्त फुशारक्या मारत आहेत. मग तो इंग्रजीत म्हणाला, 'तुम्हाला इथे आमंत्रित केले आहे का?' "किंवा नाही' मग तो गोरा मुलगा म्हणाला की हो, आम्ही अंबानीचे मित्र आहोत. तो पुन्हा पुन्हा सांगत होता की आपण खूप श्रीमंत लोक आहोत. पण आता अँटिलियाचा सिक्युरिटी भडकला. आणि तो कडक शब्दात म्हणाला की, 'तुमच्याकडे काही मेल आहे का?'
तो गोरा परदेशी त्याच्याच सुरात सांगत होता की, अंबानी म्हणाले होते की, तुम्ही कधीही येऊ शकता. एका व्यक्तीने सांगितले की जा आणि त्यांना सांग की आम्ही आलो आहोत. आता गार्डने स्पष्टपणे सांगितले की, ते घरी नाहीत. पण परदेशी हुशार मुलांनी सिक्युरिटीला विचारलं की, अंबानी घरी आहेत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.