तरुणांनो, ही संधी गमावू नका, पोलीस भरतीसाठी तातडीनं करा अर्ज
वयोमर्यादा संपलेल्यांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी, पाहा कसा कराल अर्ज, किती भरावं लागणार शुल्क
Police Recruitment 2022 : पोलिस भरतीची तुम्ही वाट पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत सुरु झालीय. कोरोना काळात पोलिस भरती होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारनं स्वतंत्र निर्णय घेत 1 जानेवारी 2020 ते डिसेंबर 2022 या काळात वयोमर्यादा संपलेल्यांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिलीय.
कसा कराल अर्ज?
- पोलीस भरतीसाठी policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटवर अर्ज करा
- शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 28 आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 33 पर्यंत असणार आहे
- उंची : 165 सें.मी.
- मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण घेतलेल्या उमेदवारांमधून उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाणार आहे.
- 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण अपेक्षित आहेत. मैदानी आणि लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची मेरिट यादी लावली जाईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी दवडून नका.