मुंबई : गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये मुंबईत ड्रग्ज पार्टीत पकडलेला अरबाज मर्चंट शुक्रवारी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात पोहोचला होता. यावेळी अरबाज मर्चंटसोबत त्याचे वडील अस्लम मर्चंटही होते. ड्रग्ज पार्टीत पकडलेल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज मर्चंट एनसीबी कार्यालयात हजेरी लावून बाहेर पडत होता. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना फोटो क्लिक करण्यास सांगितले.


त्यानंतर अस्लम मर्चंटने त्यांचा मुलगा अरबाज मर्चंटला पोज देण्यास सांगितले. यावर तो संतापला आणि फोटो क्लिक न करता तेथून निघून गेला. पण तेथून जाण्यापूर्वी तो म्हणाला,'Stop it Dad'



त्याचवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही शुक्रवारी दुपारी त्याची साप्ताहिक हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचला. एनसीबी कार्यालयातून बाहेर पडताना आर्यन खानला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले.


3 ऑक्टोबर रोजी अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि मुनमन धमेचा यांच्यासह इतरांना NCB टीमने मुंबईतील ड्रग्ज पार्टीमध्ये पकडले होते. यानंतर सर्वांची एनसीबीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर सर्वांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले. तब्बल महिनाभरानंतर तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.