मुंबई : अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या सात नोटिसांना उत्तर न देणाऱ्या अर्णब गोस्वामींविरोधात दुसरा हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अवमानप्रकरणी, अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंग मांडला होता. 


न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हक्कभंग संदर्भात आज विधानसभेत विशेषाधिकार समितीची आज बैठक बोलावण्यात आली. त्यात प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग समितीसमोर आपली बाजू मांडली. आता अर्णब गोस्वामी तिहेरी अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. एकीकडे  अर्णब गोस्वामींचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अर्णब गोस्वामींच्या हायकोर्टातल्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय. उद्या दुपारी पुन्हा जामिनावर सुनावणी होणार आहे. 


अर्णबनंतर दोघांना अटक


दरम्यान अर्णबनं अलिबाग कोर्टातला जामीन अर्ज मागे घेतला. अलिबाग कोर्टातला अर्ज मागं घेतल्यानंतरच हायकोर्टात सुनावणी शक्य होती. या तांत्रिक अडचणीमुळे अर्णब यांच्या जामिनावरील सुनावणी आज होऊ शकली नाही, असे सांगण्यात येते आहे. तर दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे. याद्वारे पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. यावर आता ७ नोव्हेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. तर त्यांच्यावर पुन्हा हक्कभंग दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.