डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून आपल्या गावी जाण्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि इतर ठिकाणच्या रेल्वे तर्फे गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र मुंबई, ठाणे,नवी मुंबई ,पनवेल, दिवा , कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये अनेक कोकणवासीय नागरिक,कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात राहतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे तिकिटासाठी पैसे नसलेल्या कामगारांना असं मिळालं तिकिट


 


त्यांच्याकरिता सरकारने विशेष ट्रेन सोडाव्यात अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेच्या डीआरएमना ट्विट केले आहे. 
मुंबई,ठाणे,नवी मुंबई,पनवेल,दिवा, कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये अनेक कोकणवासीय राहतात. त्यांना कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन उपलब्ध करून दिल्यास बस वा इतर उपाययोजनांपेक्षा अधिक सोयीचे व सुरक्षित ठरेल. या ट्रेन्स मुंबई, ठाणे,दिवा आणि पनवेल या  स्थानकातून सोडाव्यात, अशी मागणीही राजू पाटील यांनी केली आहे. 


लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीत अडकलेल्यांसाठी दिलासादायक बातमी


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात अडकून पडलेल्या परराज्यांतील मजुरांसाठी विशेष ट्रेन्स सोडल्या जात आहे. आतापर्यंत हजारो मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या कोकणवासियांनाही आपल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर अनेक कोकणवासियांनी ट्रेनच्या तिकीटासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. मात्र, प्रशासनाने सध्यातरी केवळ मजुरांनाच मुंबई आणि पुण्यातून बाहेर सोडण्यात येईल,अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. परंतु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १७ मे नंतर सार्वजनिक वाहतूक सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे १७ मे नंतर तरी आपल्याला गावी जाता येईल, अशी आशा अनेक कोकणवासियांना वाटत आहे.