मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ साठी भाजप उमेदवांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत १२५ जणांच्या नावांचा समावेश आहे. तसंच ५२ आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलेलं या यादीतून आढळून येतंय. तर १२ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलंय. या यादीत १२ महिलांच्या नावाचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून भाजपात आलेल्या आयारामांनाही या यादीत प्राधान्य मिळालेलं दिसतंय. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक, बबनराव पाचपुते, जयकुमार गोरे, वैभव पिचड, राणा जगजितसिंह, शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आलंय. परंतु, एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहीत आणि प्रकाश मेहता या चर्चित नावांचा मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश नाही, हे विशेष.



यादीतील काही महत्त्वाची नावं...


नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस


औसा - अभिमन्यू पवार (मुख्यमंत्र्यांचे पीए)


नागपूर दक्षिण - मोहन मते 


नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे


नागपूर मध्य - विकास कुंभारे 


नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख 


नागपूर उत्तर - मिलिंद माने 


उमरेड - सुधीर पारवे 


हिंगणा - समीर मेघे


सावनेर - राजीव पोतदार


नंदूरबार - विजयकुमार गावित


कोथरुड - चंद्रकांत दादा पाटील


सातारा - शिवेंद्रराजे भोसले


घाटकोपर - राम कदम


इंदापूर - हर्षवर्धन पाटील


ठाणे - संजय केळकर


तुळजापूर - जगजीतसिंग पाटील (पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव)


ऐरोली - संदीप नाईक


शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील


वडाळा - कालिदास कोळंबकर, सेनेच्या श्रद्धा जाधव नाराज


मुलुंड - सरदार तारासिंग यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी


नवापूर - भरत माणिकराव गावित (माणिकराव गावित यांचा मुलगा)


फुलंब्री - हरिभाऊ बागडे


यांच्या नावांचा समावेश यादीत नाही

या १२ महिलांना मिळाली संधी


परळी - पंकजा गोपीनाथ मुंडे - पालवे


कसबा पेठ - मुक्ता टिळक


बेलापूर - मंदा म्हात्रे


दहिसर - मनिषा चौधरी


गोरेगाव - विद्या ठाकूर


धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील


चिखली - श्वेता महाले


नाशिक मध्य - देवयानी फरांदे


नाशिक पश्चिम - सीमा हिरे


पर्वती - माधुरी मिसाळ


कोपरगाव - स्नेहलता कोल्हे


शेवगाव - मोनिका राजाळे


इथे पाहा भाजपाची १२५ नावांची संपूर्ण यादी 


या आमदारांची तिकीटे कापली


- पुण्यातील कँन्टोलमेंटमधून दिलीप कांबळे यांचे तिकीट कापलं गेलंय... त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनिल कांबळे यांना तिकीट देण्यात आलं


- पुण्यातील शिवाजीनरमधून विजय काळे यांचे तिकीट कापण्यात आलंय. त्यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आलीय


- मुलुंडमधून सरदार तारासिंग यांचे तिकीट कापून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलीय


- बीड जिल्ह्यातील माजलगावमधून ए टी देशमुख यांचे तिकीट कापून रमेश आडसकर यांना तिकीट देण्यात आलंय 


- दक्षिण नागपूरमधून आमदार सुधाकर कोहळे यांचं तिकीट कापलं गेलंय. यंदा ही संधी मोहन मते देण्यात आलीय