मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांनी मस्जिदीवर असलेल्या भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच आता मनसे चित्रपट सेनेचेअध्यक्ष अमेय खोपकर ( Amey Khopkar ) , मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे ( Sandip Deshpande ) आणि अमोल कागणे ( Amol Kange ) यांनी 'भोंगा' या चित्रपटाची घोषणा केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे चित्रपट सेनेचेअध्यक्ष अमेय खोपकर, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अमोल कागणे यांनी 'भोंगा' या चित्रपटाची निर्मिती केलीय. या विषयी माहिती देताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, 'भोंगा; हा विषय राज ठाकरे सातत्याने मांडत आहेत. यामुळे देशभर वातावरण ढवळून निघाले. हा सामाजिक मुद्दा आहे, धार्मिक नाही यावर भाष्य केलेला हा चित्रपट आहे.


चित्रपट हा संदेश देण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. 2018 मध्येच हा सिनेमा पूर्ण झाला. परंतु, कोरोनामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. 2019 मध्ये या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तसेच, राज्य सरकारचेही पुरस्कार याला मिळालेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीनेच हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. ३ मे रोजी मनसेच्यावतीने राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, 3 मे रोजी अक्षय तृतीया आहे. कोणतंही शुभ काम या दिवशी करतात. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी हाच मुहूर्त निवडल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.


मनसेनं भोंगाबाबत जी भूमिका घेतली आहे. त्याबद्दल इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून चुकीचा संदेश दिला जात आहे. पहाटे 5 वाजता भोंगे वाजणार नाही अशी माहिती सूत्रांकडून आली आहे. मात्र, या सूत्रावर किती विश्वास ठेवायचा असा सवाल त्यांनी केला. 


वंचित आघाडी ही राष्ट्रवादीची टीम बी आहे. तसेच, गृहमंत्र्यांकडून राज यांना बैठकीसाठी औपचारिक निमंत्रण आलेले नाही. ते निमंत्रण आल्यावर पुढली निर्णय घेऊ, तसेच होणाऱ्या विरोधाला आम्ही भीक घालत नाही, असेही ते म्हणाले.