मुंबई : राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Political Crisis) गेल्या 3-4 दिवसात जोरात उत आलाय. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेला बंडामुळे राजकारण ढवळून निघालय. महाविकास आघाडी सरकार पडतंय की काय, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. (bjp file compaint against cm uddhav thackeray due to he violation of corona rules)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याने त्यांनी व्हीसीद्वारे जनतेला संबोधलं. या दरम्यान ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी भावनिक आवाहन केलं. तसेच शासकीय निवासस्थान असलेलं वर्षा बंगला सोडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.  


मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानुसार ते सहकुटुंब वर्षा बंगल्यातून मातोश्रीच्या दिशेने निघाले. या दरम्यान मोठ्या प्रमाणात वर्षा बंगल्याबाहेर शिवसैनिक उपस्थित होते. तसेच वर्षा ते मातोश्री म्हणजेच मलबार हिल ते वांद्रे कलानगर या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाथ शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. 


मातोश्रीला पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं एकच जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र यादरम्यान भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 


नक्की कारण काय? 


मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत जनतेला भेटल्याचं सांगत तक्रार दिलीय. मुख्यमंत्र्यांविरोधात मलबार हिल पोलिसांमध्ये ऑनलाईन तक्रार देण्यात आली आहे. तेजिंदर पाल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.


ऑनलाईन तक्रारीत काय म्हटलंय?


"मुख्यमंत्र्यांनी कोरोना झाल्यानंतरही त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलंय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी", अशी मागणी तेजिंदर पाल यांनी केली आहे.