मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा निकाल महाविकासआघाडीसाठी धक्का देणारा होता. पुरसं संख्याबळ असताना देखील महाविकासआघाडीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. सहाव्या जागेवर भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येक एक खासदार निवडून आला आहे. तर भाजपचे 3 खासदार निवडून आले आहेत. (BJP MLA Santosh Danve on Rajyasbha Election Result)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. त्यांनी थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव घेतलंय. राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी मदत केली असा दावा संतोष दानवे यांनी केलाय. संजय राऊतांनी अपक्षांना गद्दार म्हणणं चुकीचं आहे. यादीत नावच घ्यायचं असेल तर पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं घ्या असा टोला संतोष दानवे यांनी लगावलाय. 


अपक्ष गद्दार नाही तर शिवसेनेत असलेल्यांनीच गद्दारी केली असा टोला भाजप आमदार संतोष दानवे यांनी लगावलाय. त्यांनी थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव घेतलं. राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी मदत केली असा दावा संतोष दानवे यांनी केलाय. संजय राऊतांनी अपक्षांना गद्दार म्हणणं चुकीचं आहे. यादीत नावच घ्यायचं असेल तर पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं घ्या असा टोला संतोष दानवे यांनी लगावला आहे.


राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर मुंबईसह कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं.