मुंबई: मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून टोकाचे वितुष्ट निर्माण झालेल्या शिवसेना आणि भाजपमधील दरी आणखीनच रुंदावण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या विरोधानंतरही भाजपने पावन करुन घेतलेल्या राणे कुटुंबीयांतील व्यक्तींकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दांत टीका करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी बातमी: राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण


नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे. निलेश यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना एकेरीत संबोधले आहे. संजय राऊत यांच्याकडे टीव्ही आणि लाईट बिलाचे पैसे नाहीत म्हणून ते शरद पवार यांच्याकडे पत्रकारपरिषद पाहायला जातात. तर उद्धव ठाकरे हे शाळेतील लहान मुलासारखे वागत आहेत. खोटारडं म्हटल्यावर त्यांना वाईट वाटलं, बिचाऱ्यांना कोणीतरी कॅडबरी द्या, अशी खोचक टीका निलेश यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणखी चवताळण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 


'मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर



देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात राणे कुटुंबाला आपल्या धारदार जीभांना लगाम घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. कणकवली मतदारसंघातील भाजप उमेदवार नितेश राणे यांनी फडणवीसांचा हा सल्ला ऐकला होता. मात्र, नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र निलेश यांनी शिवसेनेवर टीका करणे सुरुच ठेवले होते. विधानसभा निवडणुकीत निलेश राणे कणकवलीतून विजयी झाल्यानंतर निलेश राणे यांनी अत्यंत कडवट शब्दांत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. वांद्र्याचा कवठ्यामहाकाळ कणकवलीत आल्यामुळे निलेश यांची २० हजार मते वाढली, असे निलेश राणेंनी म्हटले होते.