भाजपकडून शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत १४० जागा देण्याचा प्रस्ताव- सूत्र
आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं `एकला चलो रे`चा नारा दिल्यानं भाजपनं याची गंभीर दखल घेतल्याचं दिसतयं.
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं 'एकला चलो रे'चा नारा दिल्यानं भाजपनं याची गंभीर दखल घेतल्याचं दिसतयं.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
शिवसेनेने आपल्या भूमिकेवरुन माघार घ्यावी यासाठी भाजपनं शिवसेनेची मनधरणी करण्यास सुरुवात केलीय.
येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी १४० जागा देऊ असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेसमोर ठेवलाय. या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या मानातील कटवटपणा काहीसा कमी होऊ शकतो असा भाजपचा अंदाज आहे.
यासंदर्भात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदारांसोबत चर्चा केली. सोबत लढलो नाही तर दोघांचंही नुकसान होईल असं भाजपकडून सांगण्यात आलंय.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी टीडीपीनेसुद्धा आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले होते.
एनडीएमधील घटक पक्षांची नाराजी गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहे. त्यामुळे भाजपसाठी आगामी काळ कठीण असू शकतो हे दिसत आहे. यामुळेच कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४० जागा देण्याची तयारी भाजप नेतृत्त्वाने दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपकडून शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत १४० जागा देण्याचा प्रस्ताव- सूत्र