मुंबई : सावरकरांच्या गौरवाचा भाजपचा प्रस्ताव हाणून पाडल्यामुळे आता भाजप सावरकरांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडत नाहीये. एका व्यंगचित्राच्या निमित्तानं भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सावरकर आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या काल्पनिक संवादाचं एक व्यंगचित्र भाजपनं ट्विट केलंय. यात बाळासाहेब उद्धव ठाकरेंबाबत सावकरांशी संवांद साधताना संताप व्यक्त करत असल्याचं दाखवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तात्याराव, काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं.' असं बाळासाहेब सावरकरांना म्हणत असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. 



बुधवारी विधानसभेत सावरकरांचा गौरव करण्याची मागणी करणारा भाजपचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमात बसत नसल्याचा सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यावरुन विधिमंडळात जोरदार खडाजंगी झाली. 


२० ऑगस्ट २०१८ आणि १७ जानेवारी २०१९ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आणि सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी केली. मग सावरकरांना भारतरत्न का दिलं जात नाही?' असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.