मुंबई महापालिकेत टॅप खरेदीचं `गौडबंगाल`
मुंबई महापालिकेतील टॅब खरेदीचं `गौडबंगाल` आता उजेडात आलंय.
मुंबई : मुंबई महापालिकेतील टॅब खरेदीचं 'गौडबंगाल' आता उजेडात आलंय. महापालिका शाळांमधील मराठी, हिंदी, ऊर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी १८ हजार ७८ टॅब खरेदी करण्यात येणार आहेत.
तब्बल १८ कोटी ७१ लाख रूपयांच्या या टॅब खरेदीला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कसलीही चर्चा न करता, गुपचूप मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे पहारेक-याची भूमिका पार पाडणारे भाजपचे नगरसेवकही हा प्रस्ताव मंजूर होत असताना हाताची घडी घालून बसले होते. तर अन्य विरोधी पक्षांनीही याबाबत सोयीस्कर मौन बाळगलं.