BMC Election 2022: मुंबई पालिका प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर
BMC Election 2022 : राज्यात प्रमुख महापालिकेपैकी एक म्हणजे मुंबई महानगर पालिका होय. आगामी निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
मुंबई : BMC Election 2022 : राज्यात प्रमुख महापालिकेपैकी एक म्हणजे मुंबई महानगर पालिका होय. आगामी निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं नवीन प्रभागरचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. (BMC Election 2022: Mumbai Municipal Corporation Ward Reconstruction Plan submitted to Election Commission)
निवडणूक आयोगाने याला मान्यता दिली तर नव्याने मुंबई महापालिकेत नऊ प्रभागांची भर पडणार आहे. मुंबईतील प्रभागसंख्या 326 झाल्याने निवडणुकीतील जागांचे समीकरणही बदलण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान तीन प्रभाग वाढवल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. तर, पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात प्रभाग वाढवले जाऊ शकतात.
याबाबतचा प्रभाग पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील 2011 च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या 11 वर्षांच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन या प्रभाग पुर्नरचनेचा निर्णय करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यावेळीच निवडणूक होणे अपेक्षित आहेत. पण सध्याची कोरोनाची स्थिती आणि तिसरी लाट पाहता निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला होता. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी शिवसेनेनं 97 जिंकल्या होत्या. तर, भाजपला 83 जागा मिळाल्या होता. यावेळी भाजपकडूनही मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसही स्वबळावर उतरण्याची शक्यता आहे.