मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच त्यांच्या उद्योगापुढे असणाऱ्या दूरदृष्टीसाठी आणि त्यांच्या अनोख्या स्वभावासाठी ओळखले जातात. लोकल ते ग्लोबल हा मंत्र त्यांनी कायमच हाताशी घेत अनेक स्थानिकांना प्रकाशझोतात आणलं आहे. हेच आनंद महिंद्रा आता एकाएकी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत अतिशय महत्त्वाची बाब अधोरेखित करताना दिसत आहेत. (anand mahindra aditya thackeray  )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलंय, तेसुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात हे पाहून चर्चा तर होणारच नाही का.... (Mumbai best bus)


महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आखलेल्या एका उपक्रमाची महिंद्रा यांनी प्रशंसा केली आहे. मुंबईतील काही बस थांब्यांचं रुपडं पालटण्यासाठी ठाकरे यांनी उचललेली पावलं आणि त्याअनुषंगानं होणारे बदल स्वागतार्ह असल्याचं महिंद्रा यांनी म्हटलं. 


'मुंबईतही आता जागतिक दर्जाचे बस थांबे असतील. एक्सरसाईज बार, हिरवी छतं यांसारखे बदल पाहून छान वाटलं.... सुरेख... आदित्य ठाकरे, इकबाल सिंह चहल.... ', असं ट्विट त्यांनी केलं. 



आपल्या कामाची घेतली जाणारी दखल पाहून आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत त्यांचे आभार मानले. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासोबतच एसी बसची संख्या वाढत असताना बस थांबेही अद्ययावत आणि तितकेच लक्षवेधी असावेत यासाठीच हे सर्व केल्याचं ठाकरे य़ांनी स्पष्ट केलं. 


नवनवीन संकल्पनांच्या जोडीनं मुंबई हायटेक होतेय, मुंबईकरही हायटेक होताहेत. हा बदल तुम्हाला कसा वाटतोय?