मुंबई : आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व कशाला द्यायचं याचा विचार करण्याची गरज निर्माण झालीय... आम्ही हे असं का म्हणतोय, असा प्रश्न पडलाय ना... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच कुर्ला रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर एक महिला लोकल ट्रेनमध्ये चढत असताना तिच्या हातातून तिची बॅग खाली पडते आणि त्वरित ती महिला देखील खाली उडी मारते, ट्रेनने वेग घेतला असल्याने ती महिला गाडी खाली खेचली जात होती त्याच दरम्यान कर्त्यव्यावर असलेल्या पोलीस विकास पाटील यांनी तिला बाहेर खेचलं आणि त्या महिलेचे प्राण वाचवले. 


ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दोन सेकंद का होईना या दृष्यांमुळे आपल्या काळजाचा ठोका चुकतो... 


हातातलं सामान पडलं तर ते परत मिळू शकतं... एक गाडीनं चुकली तर दुसरी पकडता येते... मात्र आपला अमूल्य, अनमोल असा जीव परत मिळू शकतो का...? तरीही असा जिवघेणा प्रवास आपण का करायचा याचा विचार करण्याची गरज व्यक्त होतेय.