Mumbai Weather: राज्यातील वातावरणात दर दिवसाला बदल पहायला मिळतोय. राज्यामध्ये काही भागांत थंडी जाणवतेय, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय. मुंबईमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत दुपारपासून ढगाळ वातावरण राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र तरीही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत थंडीचा सिझन संपणार आहे. यावेळी हवामान तज्ज्ञांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबईसाठी सध्या कोणताही अलर्ट नाही


प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात रविवारी आणि सोमवारी दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही हेच दृश्य पाहायला मिळणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूरसह काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र मुंबईमध्ये पावसाची शक्यता नसल्याने कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 9 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी मुंबई उपनगरात किमान तापमान 19 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस होतं. या काळात मुंबईचं कमाल तापमान 30 अंशांच्या वर तर किमान तापमान 18 अंश ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. 


देशात हवामानाची परिस्थिती कशी?


देशांत आजपासून 14 फेब्रुवारीपर्यंत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा पाऊस पडू शकतो. यामुळे तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे.