मुंबई : Chief Minister Eknath Shinde and Shiv Sena chief Uddhav Thackeray's Dussehra Melava in Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांनीही मुंबईत (Mumbai News) दसरा मेळावे (Dussehra Melava ) घेण्याचं जाहीर केल्यावर मुंबई पोलिसांवर (Mumbai Police)  प्रचंड ताण येणार आहे. कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असेल. दोन्ही गट विक्रमी गर्दी जमवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांवरचा ताणही विक्रमी वाढणार आहे. ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा आहे. (Shiv Sena Dussehra Melava)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही गटांच्या एकमेकांवर टीका, झटापटीच्या घटना, आयोजनावरून न्यायालयीन लढाई या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी चाचपणी सुरू केली आहे. बीकेसीतल्या मेळाव्याला मंत्री, मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने नियमावलीप्रमाणे तिथे सुरक्षेला प्राधान्य द्यावं लागेल. तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणीही अनुचीत प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्थानिक पोलीस, एसआरपीएफ, सशस्त्र दलाची मदतही आवश्यकतेनुसार घेतली जाईल. 


शिंदे गटाचा टिझर; एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ


शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. बीकेसी मेळाव्यात होणाऱ्या या दसरा मेळाव्याचा खास टिझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात हा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असा उल्लेख टिझरमध्ये आहे. 



त्याशिवाय मेळाव्याची दोन पोस्टर्सही शिंदे गटानं प्रकाशित केलीत. त्यातील एका पोस्टरवर 'आम्ही विचारांचे वारसदार' तर दुस-या पोस्टरवर हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार असा उल्लेख करण्यात आलाय.