मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; कोरोना महाराष्ट्रात येण्याची शक्यता.....
मुंबई आणि पुण्यात जे कोरोना संशयित होते...
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली असतानाच कोट्यवधींच्या संख्येने दररोज वरदळ असणाऱ्या मुंबईसारख्या शहरावरही या व्हायरसचं सावट असेल का, अशीच चिंता अनेकांना भेडसावत होती. नागरिकांच्या मनात असणाऱ्या या सर्व शंका आणि त्यामुळे असणारं भीतीचं वातवरण पाहता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत याबाबतच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या.
प्रथमत: महाराष्ट्र, मुंबईत कोरोना येण्याची शक्यता कमी असल्याचं या पत्रकार परिषदगेत स्पष्ट करण्यात आलं. शिवाय कोरोनाबाबत सध्या भीतीचं वातावरण असलं तरीही घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मुंबई आणि पुण्यात जे कोरोना संशयित होते त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. असं असलं तरीही पुढील दहा ते पंधरा दिवस नागरिकांनी काळजी घ्यावी ही बाब यावेळी अधोरेखित करण्यात आली.
वाचा : माणसांनाच नव्हे, देवांनाही 'कोरोना'चा धसका
राज्यात मास्कचा तुटवडा नाही हे सांगत नागरिकांनी मात्र मास्क लावून फिरण्याची गरज नाही. तसंच होळी मर्यादित प्रमाणात साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणाऱ्या या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. अनावश्यक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहनही यावेळी केलं गेलं.