मुंबई :  'ध्यानी मनी, चिंतामणी' म्हणत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. याच्या आगमन सोहळ्यालाच मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरच्या शहरातील हजारो मंडळींनी खास उपस्थिती दर्शविली होती.
असा हा 'चिंतामणी' आपल्या शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.  १९६८-६९ साली सुवर्ण महोत्सव, १९७९ साली-८० साली हिरक महोत्सव तर १९९४-९५ साली ७५ वे वर्षे साजरे करण्यात आले. 


स्वातंत्र्याची प्रेरणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी फार कमी जणांनाच माहिती असेल. १९२० साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने तरुण भारावलेले होते. समाज प्रबोधन आणि लोक शिक्षणाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्याकाळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती.  


गणेशोत्सवाचे झाले उत्सव मंडळ


१९४४ साली मंडळाचे रौप्य महोत्सव साजरे झाले. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये 'चिंचपोकळी गणेशोत्सव' हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ असे नामकरण करण्यात आले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. 


वर्षातून एकदाच वर्गणी 


फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढायची आणि वर्षभर सामाजिक कार्य सुरु ठेवायचे ही परंपरा उत्सव मंडळाने आजही जपून ठेवली आहे.