CIDCO Lottery : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि मागील काही वर्षांमध्ये अतिशय झपाट्यानं कक्षा रुंदावणाऱ्या (Navi Mumbai) नवी मुंबई क्षेत्रामध्ये अनेक नव्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. सिडकोच्या मदतीनं या शहराला नवा आकार मिळाला आणि सोबतच अनेकांना हक्काच्या घराची स्वप्नही पूर्ण करता आली. आतापर्यंत अनेकांच्या स्वप्नांच्या घरासाठी हातभार लावणाऱ्या याच सिडकोनं आता नव्यानं एक सोडत जाहीर करत हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आशेचा किरण दाखवला, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच सिडकोनं ही सोडत जाहीर केली ज्यानंतर आता त्या घरांच्या किमतीसुद्धा समोर आणण्यात आल्या आहेत. वाशी, खारकोपर, बामणडोंगरी, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, पनवेल इथं असणाऱ्या सिडकोच्या सोडतीतील किमतींचा यामध्ये समावेश आहे. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत अशी मागणी सातत्यानं उचलून धरली जात असतानाच नवी मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या 67000 घरांपैकी 25000 घरं सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 


काय आर्थिक दुर्बल घटक - कार्पेट 322 साठीच्या घरांच्या किमती? पाहा... 


(अल्प उत्पन्न गट एलआयजी -LIG)
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख 
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख /46.4 लाख 


हेसुद्धा वाचा : Toress Scam चं युक्रेन कनेक्शन...मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट? 


(आर्थिक दुर्बल घटक - कार्पेट 322 )
खारकोपर  2A - 38.6 लाख 
खारकोपर  2B - 38.6 लाख 
कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 
बामणडोंगरी -31. 9 लाख 
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
खारघर बस डेपो, सेक्टर 14 - 48. 3 लाख 


सिडकोच्या वतीनं नव्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध 27 भागांमध्ये 67000 घरं उभारली जात आहेत. यापैकी काही घरांची घोषणा झाली असून, त्यासाठी हजारोंच्या संख्येनं अर्जही दाखल झाले आहेत.