मुंबई : दिल्लीची केवळ हवाच नव्हे तर पाणीही अशुद्ध असल्याचं समोर आलंय. केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली. २१ मोठ्या शहरांमधील पाण्याच्या शुद्धतेत मुंबई अग्रस्थानी आहे. मुंबईतील पाणी सर्वाधिक शुद्ध असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये दोष नसल्याचं आढळून आलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं २० राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील पाण्याचे सर्व दहा नमुने तपासणीत उत्तीर्ण झाल्याचं पहायला मिळालंय. पाण्याच्या शुद्धतेत दुसऱ्या क्रमांकावर हैदराबाद आणि तिसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर आहे.