मुंबई : स्वतःच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आता भाजपा प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असतील, तर त्यांचे आभार मानण्यात गुन्हा तो काय? असा उलटप्रश्न त्यांनी विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडीडी चाळ पुनर्विकास भूमीपूजनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळं काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच 'मी इकडे राहिलो तरी आजही शिवसेनाप्रमुखांचा हाडामासाचा शिवसैनिक आहे' असंही कोळंबकरांनी म्हटलंय. 


एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असलेले कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसची वाट धरली त्यावेळी त्यांच्यासोबत कोळंबकर यांनीही काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. आज राणेंसोबत शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या अनेक आमदारांनी त्यांचा हात सोडलाय... मात्र, कोळंबकर आजही काँग्रेसमध्येच आहेत... सध्या राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या भविष्य काळातील कथित भाजप प्रवेशावर अनेकदा चर्चा होतात... त्यामुळेच कालिदास कोळंबकर यांचे हे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत.