ऋचा वझे, झी २४ तास, मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि सगळेच घरी अडकले. तसं पाहिलं तर सर्वांनाच ब्रेक मिळाला. त्यात अनेक ऑफिसेस ने वर्क फ्रॉम होम सुरू केलं. यामध्ये नोकरदार महिलांची मात्र तारांबळ च उडाली. कारण वर्क फ्रॉम होममध्ये अक्षरशः १२-१३ तास काम करायला लागतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योगिता सावंत या मुंबईत आयटी कंपनीत फायनान्स डिपार्टमेंट ला काम करतात. ऑफिस सुरू असताना ८ ते ९ तासांची ठराविक शिफ्ट व्हायची. मात्र वर्क फ्रॉम होम ही त्यांच्यासाठी शिक्षाच झालीय. घरची कामं तर आहेत परत ऑफिस चे कामही आलंय. सततचे कामाचे फोन यामुळे अनेक महिला आता त्रस्त झाल्यात. 


अगदी घरी सुद्धा नाईट शिफ्ट करण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय. नाही म्हणलं तरी महिलांना शारीरिक कष्टापेक्षा मानसिक त्रासच जास्त होतोय. त्यात घरातील इतर मंडळींनी हातभार लावला नाही तर सगळं काम यांच्यावरच पडतं. यामुळे महिला चांगल्याच मानसिक तणावाखाली आल्यात



कोरोना काळात नोकरदार महिलांची चांगलीच तारांबळ उडाली. पन्नास टक्के महिला या काळात मानसिक तणावाखाली आल्याचं समोर आलंय. महिलांनी हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यामध्ये महिलांनी कामासोबतच काही विरंगुळा शोधण्याची ही गरज असल्याचं मानसोपचार तज्ञ  निर्मला राव सांगतात.


कोरोनाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या असल्या तरी आता पुन्हा सुरळीत पहिल्यासारखं रुटीन सुरू व्हावं अशी सर्वच अपेक्षा करत आहेत. वर्क फ्रॉम होम ऐकायला किती ही चांगलं वाटलं तरी त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. सध्याच्या काळात आपल्या कामाचा ताण न घेता हे वर्क फ्रॉम एन्जॉय करणं जास्त गरजेचं आहे.