मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या साथीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. येथे कोरोनाचे ३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूने आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये शिरकाव केला आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा रुग्ण ५६ वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबातील ८ ते १० जणांना क्वारंटाइन करणयात आलं आहे. ज्या इमारतीत हा रूग्ण राहत आहेत त्या इमारतीला सील करण्यात आलं आहे. धारावी १५ लाख लोकं राहतात. धारावी हे ६१३ हेक्टर क्षेत्रावर पसरले आहे. धारावीमध्ये लाखो मजुरी करणारे आणि छोटे व्यापारी राहतात.


हे पण वाचा: कोरोनाच्या संकाटात गरीबांच्या मदतीसाठी किर्तनकार इंदोरीकर महाराजांची मदत


बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १८ नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत फक्त बाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना झाला होता. पण आता तो येथील सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत फक्त श्रीमंतामध्ये आढळलेला कोरोना आता राज्यातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे.


अधिक वाचा : कोरोनाबाबत आणखी एका गोष्टीचा खुलासा, पुरुषांनो सावधान !


महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३३५ रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी ४१ जणांना घरी सोडण्यात आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.


अधिक वाचा : कोरोनाचं संकट असताना जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट