मुंबई : कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे. दरम्यान, दिवाळीनंतर पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात नोंद झाली असून, मुंबईतील ४८ टक्के केसेस हे पश्चिम उपनगरातील आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मालाड, गोरेगाव, दहिसर आणि वांद्रे येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद केली गेली आहे. पश्चिमेकडील उपनगरामध्ये लॉकडाऊन उठवल्याने आणि चाचणीत वाढ झाल्याने रुग्णांची वाढलेली संख्या दिसत आहे. दरम्यान, चर्नी रोड, मरीन लाईन्स, काळबादेवी, कुलाबा आणि चर्चगेट यासारख्या भागात सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद आहे.


रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्ट


दरम्यान, रेल्वेने प्रवास केलेल्यांची मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्ट करण्यात आली. आतापर्यंत दोन लाख प्रवाशांची टेस्ट झाली असून त्यात फक्त ८८ जणांनाच कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिलीय. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून आलेल्या प्रवाशांची टेस्ट केलीय.. दादर टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, बोरिवली स्टेशन, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशन्सवर प्रवाशांची टेस्ट केलीय.. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलीय त्यांची रवानगी आयसोलेशनमध्ये केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.



राज्यातील अनेक जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


जनतेला कोरोनाची तीव्रता समजली आहे, आता कोरोनाला गांभिर्याने घेण्याची गरज आहे; नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.