Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. 2 दिवसांपूर्वी तो चीनहून परतला होता. उत्तर प्रदेशात (UP) हा कोरोनाबाधित रूग्ण सापडला असून, त्याला आग्रा येथे त्याच्याच घरात गृह विलगीकरणाक (Home quarantine) करण्यात आलं आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठी पावलं उचलण्यास सुरुवात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना पुन्हा डोकं वर काढत असतानाच मुंबईतही (Mumbai Corona updates) या संकटाच्या झळा पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. 2020 मध्ये जे संकट ओढावलं होतं ते परतल्यास तोंड देण्यासाठी मुंबई मनपा सर्वतोपरी तयारी करताना दिसत आहे.. यासाठी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडाही तयार केला आहे. (Covid war rooms to testing Mumbai is all set to fight corona latest News in marathi )


शहरातील सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा ही दोन रुग्णालयं पालिकेच्या अखत्यारित येतात तर कामा, सेंट जॉर्ज, टाटा आणि जगजीवन राम ही रुग्णालयं सरकारी आहेत. याशिवाय 876 खाटांची क्षमता असलेली 26 रुग्णालयं मुंबईत आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : जगाला धडकी भरवणारी बातमी; चीनमध्ये एका दिवसात 3 कोटी 70 लाख कोरोना रुग्ण


रुग्णांसाठी ऑक्सिजन (Oxygen) आणि आयसीयू (ICU) बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णालयांतील रुग्णांच्या भरतीचं संपूर्ण नियंत्रण आणि व्यवस्थापन हे वॉर रूमद्वारे होणार आहे. जनरल बेड, ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.  पालिकेकडून सज्ज ठेवण्यात आलेल्या सुविधांमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, ड्युरा सिलेंडर्स आणि पीएसए टँकच्या स्वरूपात पुरेसा ऑक्सिजन साठा तयार असल्याचं कळत आहे.  


बूस्टर डोस घेण्यासाठी धावपळ (Booster Dose)


राज्यात कोरोनाची (Maharashtra Corona cases) दहशत पुन्हा पाहायला मिळत असून गेल्या तीन दिवसांमध्ये बूस्टर डोस घेण्यासाठी अनेकांनीच लगबग केल्याची पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोमवार ते गुरूवार या कालावधीत रोज सरासरी 500 ते 800 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. असं असलं तरीही राज्यातील साधारण 6.71 कोटी नागरिकांनी अद्यापही बूस्टर डोस घेतलेला नाही.


सरकारकडून कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा केला जात असला, तरीही नागरिकांकडून मात्र कोविशिल्डबाबत विचारणा केली जात आहे. बूस्टर डोस घेतल्यास आगामी संकट टाळता येऊ शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं असल्यामुळं आता अनेकजण ही लस घेण्यासाठी घाई करताना दिसत आहेत.