मुंबई : मुंबईत कोरोना संसर्गाचं थैमान सुरू आहे. प्रशासनाने उभारलेली आरोग्य यंत्रणाही येत्या काहीच दिवसात अपूरी पडते की काय? अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचीही संख्या वाढल्याने मुंबईत फक्त २० टक्के ICU बेड शिल्लक  असल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील रुग्णालयांत रोज हजारोंनी नव्या रुग्णांची भर पडू लागलीये. ICUतही केवळ २०%बेड शिल्लक असल्याची महिती आकडेवारीवरून समोर आली आहे..  


खाटांची संख्या २१ हजारापर्यंत वाढवण्याचे पालिकेचे प्रयत्न असले तरी वाढवेल्या खाटाही लगेचच भरत आहेत. 


मुंबईतील ६९ नर्सिंग होमही पालिकेनं ताब्यात घेतले आहेत. सध्या मुंबईत ५८ हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. 


त्यापैकी सुमारे १० हजारांहून अधिक रुग्णांना लक्षणे आहेत, तर गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ८९९ रुग्ण गंभीर आहे.