मुंबई : भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजूला शेट्ये मृत्यू प्रकरणात चौकशी आता मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. नागपाडा पोलिसांकडून हा तपास काढून घेतला असून आता या प्रकरणाची पुढील सर्व चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे.


मंजुला शेट्येला जेलमध्ये माराहण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्यानुसार मुंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०२ म्हणजे हत्येच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात भायखळा जेलच्या अधीक्षक मनीष पोखरकर यांच्यासह ६ पोलिसांची नावं आरोपी म्हणून आहेत. पण ५ दिवस उलटूनही या प्रकरणात कोणाला अटक झालेली नाही. त्यामुळे नागपाडा पोलीस नि:पक्ष पातीपणे चौकशी करतील का? याबाबत शंका निर्माण झाल्याने हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपावण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्या अनुषंगाने आता मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.