Traffic Police Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईसह दोन शहरातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
Traffic Police Video : चाललं तरी काय आहे, तीन ठिकाणी वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवर कारचालकाने फरफटत नेल्याचा थरार व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईसह (Navi Mumbai Traffic Police Video) अजून दोन शहरातील धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. (Viral Video)
Traffic Police Video : सोशल मीडियावर अनेक थरकाप आणि धक्कादायक व्हिडीओ आपली झोप उडवतात. त्यातील काही व्हिडीओ हे अपघाताचे असतात तर गुन्हेगारी जगतातील असतात. शनिवारी रात्री माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची गोळ्या झाडून हत्या करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश (UP Crime News) पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Latest Marathi News)
तरदुसरीकडे कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता त्या तिघांनी केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहनचालकांनी नियमाचं उल्लंघन केलं आणि वाहतूक पोलिसांपासून वाचण्यासाठी कारचालकाने जे कृत्य केलं ते सीसीटीव्हीत (#CCTV) कैद झालं आहे. मुंबईसह दोन शहरात या घटनेचे थरकाप उडणारे व्हिडीओ समोर आले आहेत.
अरेरे, खतरनाक!
पहिली घटना मुंबईतील नवी मुंबईमधील आहे. अंमली पदार्थ आणि स्फोटके असल्याच्या संशयावरुन या वाहतूक पोलिसानं कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण कारचालकाने गाडी न थांबता गाडी पोलिसाच्या अंगावर घातली. कारला थांबविण्यासाठी जाब पोलिसाने त्या बोनेटला धरुन ठेवलं तरी चालक थांबला नाही.
या कारचालकाने भर दिवसा पोलिसाला कारच्या बोनेटवरुन 10 ते 12 किलोमीटर फरफटत नेले. नवी मुंबईतच्या पाम बीच रोडवर हा सगळा थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी या कारचालकाचा पाठलाग केल्यानंतर वाहतूक पोलिसाची सुटका झाली. हा व्हिडीओ ट्वीटरवर @Satish_Daud या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
काळजाचा ठोका चुकवणाऱ्या व्हिडीओ
दुसरा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पंजाबच्या लुधियानामधील. इथेही एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला उडवत बोनेटवरुन फरफटत नेलं. हरदिप सिंघ असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर @NikhilCh_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
थरकाप उडविणारा व्हिडीओ
तर तिसरी घटना ही पंजाबमधीलच असल्याचं बोलं जातं आहे. काळजाचा ठोको चुकवणाऱ्या या व्हिडीओमध्ये कार चालकाला थांबविण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर चढला. कार चालकाने गाडीला ब्रेक न लावता त्या पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं. हे दृश्यं पाहून नागरिक कारच्या मागे धावले. मग त्या ड्रायव्हरने काही अंतरावर जाऊन गाडी थांबली आणि पोलिसाचा जीव वाचला.
पोलिसांनी कार चालकाला गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तो खूप घाबरलेला दिसत होता. हा व्हिडीओ ट्वीटरवर @Arhantt_pvt या अकाऊंटवर टाकण्यात आला आहे.