मुंबई : शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाविरोधात आरोग्य यंत्रणा आणि राज्यसराकरची सुरु आहे. कोरोनाचे संकट कायम असताना आता मुंबईला डेंग्यू आणि मलेरियाचा धोका पोहोचला आहे. मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू मलेरियाचा धोका वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची डोकेदुखीत अधिक भर पडलेली दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणात १४५० ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास झाल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी ११४६ ठिकाणी डेंग्यूचे तर ३३३ ठिकाणी मलेरियाच्या डासांची अंडी सापडली आहेत. त्यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली आहे. बीएमसीचे १५०० कर्मचारी डेंग्यू आणि मलेरिया पैदास रोखण्यासाठी गेले काही दिवस सातत्याने शहरात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवत आहे. 


कोविड रुग्णांसाठी  जम्बो फॅसिलिटी सेंटर 


दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील रेसकोर्स इथे कोविड रुग्णांसाठी सुमारे १ हजार बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील ३०० बेडचे कोवीड केअर सेंटर रेसकोर्सच्या पार्किंग लॉटमध्ये तयार केले असून येत्या २-३ दिवसांत काम पूर्ण होईल. ३०० बेडपैकी १५० बेडना ऑक्सीजनची सुविधा असून सर्व सेंटर वातानुकूलित आहेत.
 
रुग्णांसाठीच्या टॉयलेट, बाथरूमचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात ५०० बेडचे आणखी एक सेंटर आणि १२६ बेडचे आयसीयू १५ दिवसांत तयार होणार आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अधिकाधिक बेड वाढवण्यासाठी जम्बो फॅसिलिटी सेंटर उभी केली जात आहेत. वरळी एनएससीआय आणि बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानातील कोविड रुग्णांसाठीचे तिसरे जम्बो फॅसिलिटी सेंटर आता रेसकोर्सच्या मैदानाच्या पार्किंग लॉटमध्ये उभारण्यात येत आहे.