मुंबई : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज कॅगचा अहवाल विधीमंडळात मांडला जाणार आहे. कॅगचा अहवाल २०१३ पासूनचा आहे. मेट्रो असेल किंवा इतर प्रकल्प टेंडर आमच्या काळात निघाले नव्हते अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिडको ही स्वायत्त संस्था आहे, त्याचे निर्णय राज्य सरकार घेत नाही, फाईल कोणत्याही मंत्र्यांकडे येत नाही, जर कॅगवरच बोलायचं असेल तर कॅगचा गृहनिर्माण विभागावरच्या अहवालावर का बोलत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मांडल्या जाणाऱ्या अहवालात भाजपच्या काळातील नवी मुंबई विमानतळच्या कामातील सिडकोतला गैरव्यवहार समोर येणार असल्याची चर्चा आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी बारा वाजता कॅगचा अहवाल मांडला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात या अहवालावर राज्य मंत्रिमंडळातच्या बैठकीत चर्चा झाली होती. चर्चेनंतर अहवाल राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला होता.