मुंबई : ठाकरे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासतील सर्वात डरपोक आणि खंडणीखोर सरकार असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदाधिकाऱ्यांना वाटतंय की त्यांचं सरकार फार काळ टीकणार नाही, म्हणून महाविकास आघाडीत भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली आहे, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यांच्या भांडणं सुरु आहेत पण ती जनतेच्या प्रश्नांसाठी नाही तर आपल्याला हिस्से जास्त मिळावेत यासाठी. नोकरशाही सर्वात भ्रष्ट होत चालली आहे, पैसे देऊन पोस्टींग घेतली जात आहे, लोकांना त्रास देत वसुली सुरु असल्याचा घणघात फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.


तीन नापास एकत्र आले, जनतेने घरी बसवलं होतं, पण जनतेचा घात करत सत्तेवर आले अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली आहे.  युवा पिढी बरबाद करण्याच काम हे सरकार करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केलं आहे.


अत्याचार, बलात्कार, व्यभिचार असे नवीन रेकॉर्ड सरकार तयार करत आहे, राज्यातील इतिहासातील डरपोक, खंडणीखोर आणि पळपूट सरकार आहे. मंत्र्यांपासून पदाधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आपल्याला किती मिळेल यासाठी या तिघांचं भांडण सुरु आहे, अशी टीका करत फडणवीस यांनी मला नोकरशाही भ्रष्ट होत आहे याची भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे.