दिशा सालीयन प्रकरण : नारायण राणे, नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात करणार अर्ज
Narayan Rane and Nitesh Rane News : दिशा सालीयन प्रकरणी भाजपचे केंदीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबई : Narayan Rane and Nitesh Rane News : सुशांत राजपूत याची मॅनेजर दिशा सालीयन (Disha Salian case) प्रकरणात भाजपचे केंदीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिसानी जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. दरम्यान, नारायण राणे आणि नितेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी उद्या अर्ज करणार आहे. (Disha Salian case: Narayan Rane, Nitesh Rane will apply to court for pre-arrest bail)
मालवणी पोलीस स्टेशन येथे नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात पिता पुत्रांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नारायण राणे आणि नितेश राणे उद्या दिंडोशी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत.
दिशा सालीयन प्रकरणात भाजपचे केंदीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिसानी जबाब नोंदवण्यासाठी नोटीस देण्यात आली होती मात्र नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या वकिलांनी 5 मार्च रोजी हजर राहू अशा प्रकारे पत्र देऊन कळवण्यात आले आहे.
आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली आहे. 5 मार्चला दुपारी 1 वाजेपर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात उपस्थित राहाणार आहेत.