मुंबई : देशात अस्वस्थता आहे. तरुणाईला दिशा देण्याची गरज आहे. मराठी माणसाचे हात बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया प्रवेशानंतर चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आपण शिवसेनेचे घर सोडून वेगळ्या घरात आलो असलो तरी या घरातील माणसे माझीच आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, असे ते म्हणालेत.


शिवसेनेला मोठा धक्का, डॉ. अमोल कोल्हे करणार 'जय महाराष्ट्र' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खरतर अनेकांना प्रश्न पडला असेल की मी हा निर्णय का घेतला? तरुणांना विधायक वाटेची गरज आहे, असे वाटते आणि ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे पवारांचे हात बळकट करावे, मराठी माणसाचे हात बळकट करावे यासाठी मी आज प्रवेश केला आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे. आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा म्हणून मी आज हा निर्णय घेतला. अजित पवार यांनी मला कायम मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आंनद होत आहे. कारण लहानपणी ज्या पवार साहेबांची छबी पाहता यावी म्हणून मागे पळत यायचो त्याच पवार साहेबाच्या पक्षात आज मी प्रवेश करतो याचा मला आनंद वाटत आहे, असे कोल्हे म्हणालेत.


छोट्या पडद्यावर छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीत गेल्याने हा शिवसेनेसाठी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का आहे. कोल्हे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या विचाराचे बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्यावेळी दिली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांच्यावर चित्रपट सेनेची जबाबदारी होती.