मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत दाखल करण्यात याचिकेबाबत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या याचिका प्रकरणात राज्य सरकार मौन का बाळगून आहे असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यास राज्य सरकार अपयशी ठरलंय असंही मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. 


या प्रकरणाची काय चौकशी केली ते तीन आठवड्यांत सांगा असा आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. सरकार चौकशी करण्यास अपयशी ठरलं तर चौकशी करुन घेणं आमचं कर्तव्यच असेल असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. 


दमानियांची याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा खडसे यांनी कोर्टात दावा केलाय. याचिका दाखल करताना आपली राजकीय पार्श्वभूमी याचिकाकर्त्यांनी जाहीर केली नाही. त्यामुळे ही याचिका रद्द करण्यात यावी अशी मागणी खडसेंनी केली आहे.