EPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजच पूर्ण करा हे काम नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
तुमच्या EPFO खात्यामध्ये हे डिटेल्स तुम्ही भरले नसतील तर आजच भरा, नाहीतर पैसे काढताना होईल मोठी समस्या
मुंबई: ज्या नागरिकांना सॅलरी अकाऊंट आहेत त्यांची EPF खाती कंपनीकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघांचेही पीएफ जमा होत असतात. तुमचंही EPF खातं असेल किंवा घरातील कोणाचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिवस बदल करण्यात आले आहेत.
EPF ने आपल्या ट्वीटरवर एक ट्वीट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. खातेधारकांना ई नॉमिनेशन करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे तुमचं खातं अधिक सुरक्षित होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. EPF ने आपल्या ग्राहकांना एक व्हिडीओ ट्वीट करून ई नॉमिनेशन कसा फाइल करायचा ते सांगितलं आहे.
EPFO ने नॉमिनी व्यक्तीची माहिती देण्यासाठी ई-नामांकन सुविधा ऑनलाइन सुरू केली आहे. ज्यांनी नॉमिनिचं नाव दिलं नसेल किंवा अपडेट केलं नसेल त्यांनी आजच हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे. नॉमिनी व्यक्तीचे नाव या माहितीनंतर, जन्मतारीख ऑनलाइन अपडेट केली जाईल. ईपीएफओने आपल्या ग्राहकांना सांगितले की ईपीएफ खातेधारकाने ई-नामांकन (ईपीएफ / ईपीएस नॉमिनी) करणं गरजेचं आहे.
खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन (ईपीएस) आणि विमा (ईडीएलआय) शी संबंधित पैसे काढण्यासाठी नॉमिनी / कुटुंबातील सदस्यांना मदत होते. नॉमिनी व्यक्ती ऑनलाइन देखील दावा करू शकतो.
कसं करायचं नॉमिनेशन
-EPFOची वेबसाईट सुरू करा. तिथे तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करा. https://www.epfindia.gov.in/ या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला UAN नंबर अपलोड करता येईल.- Services सेक्शनमध्ये FOR EMPLOYEES पर्यायावर क्लीक करा. Member UAN/Online Service (OCS/OTCP) वर क्लीक करा.
- तिथे UAN आणि तुमचा पासवर्ड अपलोड करा
-Manage Tab अंतर्गत E-Nomination पर्याय निवडा, त्यानंतर तिथे Provide Details असा पर्याय येईल. तिथे तुम्ही ज्या व्यक्तीला नॉमिनी ठेवू इच्छीता त्याचे डिटेल्स भरा.
-फॅमेलि डिक्लेरेशनवर क्लीक करा तिथे सर्व डिटेल्स अपलोड करा. तिथे तुम्ही नॉमिनी डिटेल्स भरू शकता.
- EPFO ई-नॉमिनेशन रजिस्टर केल्यानंतर हार्ड कॉपी डॉक्यूमेंट पाठवून द्या.